खंर तर टीम इंडियाने आज संपूर्ण दिवस पर्थच्या मैदानावर प्रॅक्टीस केली. यावेळी संघाचे सर्वच सदस्य मैदानात उपस्थित होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आज मैदानात अनेक तास फलंदाजीची प्रॅक्टीस केली. विराट कोहलीने जास्त उसळी घेणाऱ्या बॉलची प्रॅक्टीस केली. तर रोहित शर्माने फुलर लेंथ बॉलवर प्रॅक्टीस केली. या दरम्यान गौतम गंभीरही मैदानात उपस्थित होता.
advertisement
आता रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गौतम गंभीर आणि रोहित शर्मामध्ये प्रॅक्टीस सेशन दरम्यान चर्चा करताना दिसत आहे. या फोटोमधील रोहित शर्माची रिअॅक्शन पाहण्यासारखी.त्याचसोबत या फोटोवरून नेटकरी कमेंटचा पाऊस देखील पाडतायत.
खरं तर रोहित शर्माला वनडेच्या कर्णधार पदावर कायम राहायचे होते. कारण त्याचे 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न होते. पण रोहित शर्माला कर्णधार पदावरून पाय उतार होण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. आणि त्याच्या जागी शुभमन गिलला वनडेचा कर्णधार बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीवर रोहित शर्माने मौन बाळगले आहे.त्यामुळे या गोष्टीवरून रोहित गंभीर आणि निवड समितीवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात हा फोटो व्हायरल झाल्याने रोहित गंभीरवर किती नाराज आहे? हे या फोटोवरून स्पष्ट होत आहे.