डावाच्या ३१ व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज सीन एबॉटने शतक केलेल्या श्रेयस अय्यरला तिसरा चेंडू टाकला. तेव्हा श्रेयसने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण उंच उडालेला चेंडू सीन एबॉटच्या दिशेने गेला. एबॉटने झेप घेत चेंडू हातात झेलला. यावेळी अय्यर पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. श्रेयस अय्यर खेळपट्टीवरून पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना प्रेक्षकांच्या दिशेने त्याने बॅट उंचावून अभिवादन केलं. प्रेक्षकांनीही त्याचे उभा राहून अभिनंदन केलं. दरम्यान, अचानक तो थांबला. अय्यरच्या विकेटबाबत रिप्ले दाखवला जात होता.
advertisement
Shubman Gill : गिलचा शतकी धमाका, सचिन-द्रविड-गांगुलीच्या पंगतीत पटकावलं स्थान; केला विश्वविक्रम
तिसऱ्या पंचांनी पाहिलं की सीन एबॉटने झेप घेतली आणि चेंडू झेलला त्यानतंर एबॉट खाली पडला. त्यावेळी त्याचा हात जमिनीला लागला. पंचांनी यावेळी पुन्हा पुन्हा रिप्ले पाहिला. शेवटी एबॉटच्या हातातला चेंडू जमिनीला लागल्याचं दिसलं आणि अय्यरला पुन्हा फलंदाजीला बोलावण्यात आलं.
अय्यरने मैदानात परत येताच सीन एबॉटच्या गोलंदाजीवर चौकार मारला. मात्र त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. मॅथ्यू शॉर्टने त्याचा झेल घेतला. श्रेयस अय्यरने शुभमन गिलसोबत २०० धावांची भागिदारी केली.