Shubman Gill : गिलचा शतकी धमाका, सचिन-द्रविड-गांगुलीच्या पंगतीत पटकावलं स्थान; केला विश्वविक्रम
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडत गिलने ९२ चेंडूत शतक झळकावलं. यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले.
इंदौर, 24 सप्टेंबर : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलं. त्याचं यंदाच्या वर्षातलं हे सहावं शतक आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडत गिलने ९२ चेंडूत शतक झळकावलं. यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. २५ वर्षे पूर्ण होण्याआधी एकाच वर्षात पाच पेक्षा जास्त शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये गिलने स्थान मिळवलं आहे. सर्वात कमी वयात एका वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ पेक्षा जास्त शतके करण्याची कमाल उपुल थरांगाने केली होती. तर या यादीत सचिन तेंडुलकर, ग्रॅमी स्मिथ, विराट कोहली यांचीही नावे आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच पेक्षा जास्त शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीतही शुभमन गिलने स्थान पटकावलंय. भारताकडून विराटने सर्वाधिक चार वेळा तर रोहित शर्माने तीन वेळा अशी कामगिरी केलीय. सचिन तेंडुलकरने दोन वेळा ५ पेक्षा जास्त शतके केली आहेत. तर राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि शिखर धवन यांनी प्रत्येकी एक वेळा वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत.
advertisement
शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५ डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने हाशिम आमलाचा विक्रम मोडला. हाशिम आमलाने ३५ डावात १८४४ धावा केल्या होत्या. आता गिल पहिल्या तर आमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बाबर आजम असून त्याने ३५ डावात १७५८ धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या नावावर ३५ डावात १९१८ धावा जमा झाल्या आहेत.
advertisement
यंदाच्या वर्षात शुभमन गिलने षटकारांच्या बाबतीत भारताचा कर्णधार रोहित शर्मालासुद्धा मागे टाकलं आहे. रोहित शर्माने २०२३ मध्ये आतापर्यंत ४३ षटकार मारले आहेत. त्याला आजच्या सामन्याआधी रोहितचा विक्रम मोडण्यासाठी २ षटकार हवे होते. गिलने कॅमेरून ग्रीनने टाकलेल्या दहाव्या षटकात षटकार मारताच रोहितला मागे टाकले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2023 5:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : गिलचा शतकी धमाका, सचिन-द्रविड-गांगुलीच्या पंगतीत पटकावलं स्थान; केला विश्वविक्रम