'नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. ऍडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये नितीशच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती. यानंतर त्याने मानेच्या दुखापतीचीही तक्रार केली, ज्यामुळे त्याला 3 सामने खेळता येणार नाहीत', असं बीसीसीआयने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.
नितीश कुमार रेड्डीने या महिन्याच्या सुरूवातीलाच वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने नितीश रेड्डीच्याऐवजी हर्षित राणाला संधी दिली, तसंच जसप्रीत बुमराहचंही टीममध्ये कमबॅक झालं. तर ऑलराऊंडर शिवम दुबे हा फास्ट बॉलिंगसाठी तिसरा पर्याय होता. याशिवाय कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या तीन स्पिनरनाही संधी मिळाली, पण पावसामुळे सामना रद्द झाला, त्यामुळे भारताला बॉलिंग मिळाली नाही. नितीश रेड्डी हा 6 नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या टी-20 पासून निवडीसाठी उपलब्ध असेल.
advertisement
हर्षित राणावर जबाबदारी
नितीश रेड्डीच्या गैरहजेरीत हर्षित राणावर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. या टी-20 सीरिजमध्ये हर्षितला आठव्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागणार आहे. हर्षितने याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये एकदाच आठव्या क्रमांकावर बॅटिंग केली आहे. आशिया कपमध्ये ओमानविरुद्धच्या सामन्यात हर्षित राणाने आठव्या क्रमांकावर बॅटिंग करताना 13 रनची नाबाद खेळी केली होती.
