श्रेयंका पाटीलचे पुनरागमन
हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर या दोन्ही मालिकांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून संघाची साथ देईल. वनडे संघात काही मोठे बदल पाहायला मिळत असून यात वैष्णवी शर्मा, जी कमलिनी आणि काश्वी गौतम यांसारख्या युवा खेळाडूंची वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे उमा चेत्री, यस्तिका भाटिया आणि प्रतीका रावल यांना या दौऱ्यासाठी डच्चू देण्यात आला आहे. हरलीन देओलला वनडे संघात कायम ठेवले असले तरी टी२० संघातून तिला वगळण्यात आले असून तिच्या जागी श्रेयंका पाटीलचे पुनरागमन झाले आहे.
advertisement
भारती फुलमालीची एन्ट्री
या दौऱ्यातील सर्वात चर्चेची बाब म्हणजे भारती फुलमालीची तब्बल ७ वर्षांनंतर टी२० संघात झालेली वापसी होय. भारताच्या टी२० मोहिमेची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी सिडनी येथील पहिल्या मॅचने होईल, तर वनडे मालिका २४ फेब्रुवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाईल. या संपूर्ण दौऱ्याचा समारोप ६ मार्च रोजी पर्थ येथे होणाऱ्या एकमेव ऐतिहासिक कसोटी मॅचने होणार आहे.
भारतीय महिला टी२० संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील.
भारतीय महिला वनडे संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल.
