खरं तर सामन्याच्या सुरूवातीला एक प्रसंग घडला होता.टीम इंडियाचे सर्व खेळाडू नॅशनल अँथमसाठी मैदानावर आले होते.यावेळी विराट कोहली रांगेत पहिल्या क्रमांकावर होता.पण सिमा रेषा ओलांडायच्या आधी तो थांबला आणि त्याने कर्णधार शुभमन गिल आणि उप कर्णधार श्रेयस अय्यरला पुढे जाण्याचा मान दिला.त्यानंतर विराट कोहली त्यांच्यामागून मैदानात गेला.त्यामुळे विराट कोहलीने मैदानात केलेली ही कृती सर्वत्र चर्चेचा विषय ठरते. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
कसा रंगला सामना
भारताने डीएलएस मेथडनूसार दिलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज ट्रॅविस हेड अवघ्या 8 धावांवर बाद झाली होती.त्यापाठोपाठ मॅथ्यू शॉर्ट देखील 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर चांगल्या लयीत असलेला जोश फिलिप्स 37 धावांवर बाद झाला.कर्णघार आणि सलामीवीर मिचेल मार्शमे चांगली खेळी केली. मार्शने 46 धावांची नाबाद खेळी केली.त्याच्यासोबत मॅट रेन्शो 21 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 21.1 ओव्हरमध्ये हे लक्ष्य सहज गाठून 7 विकेटसने हा सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात खूपच खराब झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक 38 धावा या केएल राहुलने केल्या.त्याच्या पाठोपाठ अक्षर पटेलने 31 धावांची खेळी केली.या दोन खेळाडू व्यतिरीक्त शेवटच्या क्षणी नितेश रेड्डीने केलेल्या नाबाद 19 धावा केल्या. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन गगनचुंबी षटकार लगावले. यामुळेच भारत 26 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 136 धावाच करू शकली.
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या 8 धावा केल्या. तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला आणि कर्णधार शुभमन गिल 10 धावा करून बाद झाला. भारताच्या या डावानंतर अनेकदा पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे भारताला धावा करताना प्रचंड अडचणी आल्या होत्या. तरी देखील भारत 136 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.