खरं तर 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सूरूवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया उद्या 15 ऑक्टोबरला रवाना होणार आहे. याआधी टीम इंडिया दोन बॅचेसमध्ये रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये एक बॅच सकाळी रवाना होणार होती. या बॅचमधून विराट कोहली, रोहित शर्मा आणि सपोर्ट स्टाफ जाणार होते, तर त्याच दिवशी रात्री दुसऱ्या बॅचमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत वेस्ट इंडिज विरूद्ध टेस्ट मॅच खेळत असलेले खेळाडू रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. याचाच अर्थ रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर वेगवेगळे जाणार असल्याचे बोलले जात होते.
advertisement
पण आता भारताच्या ऑस्ट्रेलिया प्रवासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार भारताची संपूर्ण टीम उद्या सकाळी रवाना होणार आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचाही समावेश असणार आहे. आणि रात्री बॅचमध्ये संपुर्ण संपोर्ट स्टाफ जाणार आहे.त्यामुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा हे एकत्रित प्रवास करणार आहेत.
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली लंडनवरून भारतात आला आहे. दिल्लीत उतरल्यावर तो आपल्या कुटुंबियांच्या घरी गेला आहे.त्यानंतर उद्या टीमसोबत रवाना होईल. रोहित शर्मा देखील रवाना झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे हे दोघेही खेळाडू लवकरच संघाशी कनेक्ट होतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन