ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 339 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपची पहिलीच मॅच खेळणारी शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून आऊट झाली. यानंतर स्मृती मंधानाने जेमिमाच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण करायला सुरूवात केली, पण स्मृती मंधाना 24 रनवर आऊट झाली, स्मृतीच्या विकेटवरून बराच वादही निर्माण झाला.
ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर
पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून श्री चरिणी आणि दीप्ती शर्मा यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलला पोहोचेल. फायनलमध्ये विजेत्या टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.
