टीम इंडियाचा स्मार्ट प्लान
2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावर एमएस धोनीला बॅटिंगला पाठवलं आणि धोनीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मॅच विनिंग खेळी करून भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्येही भारताने अशीच रणनीती वापरली आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार हरमनप्रीतऐवजी जेमिमा रॉड्रिग्ज बॅटिंगला आली आणि त्यानंतर जेमिमाने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून इतिहास घडवला.
advertisement
महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, त्यामुळे आता महिला वर्ल्ड कपला नवा चॅम्पियन मिळणार आहे. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिकेला एकदाही वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आता रविवारी वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर
पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
