ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेतल्यानंतर स्मृती मंधाना जेमिमाकडे गेली आणि बॉल बॅटला लागला नसल्याचं तिला सांगितलं, पण जेव्हा अल्ट्राएजमध्ये स्पाईक दिसला, तेव्हा स्मृतीला धक्का बसला. यानंतर थर्ड अंपायरने मैदानातल्या अंपायरला निर्णय बदलायला लावला आणि स्मृतीला आऊट देण्यात आलं. मैदानाबाहेर जाताना स्मृती मंधाना धक्क्यात होती, तसंच नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये एकच सन्नाटा पसरला. लेग अंपायर लॉरेन एगनबॅगही अल्ट्राएजवरचा स्पाईक पाहून आश्चर्यचकित झाले. 24 बॉलमध्ये 24 रन करून स्मृती मंधाना आऊट झाली.
advertisement
वर्ल्ड कप सेमी फायनलच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 339 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून माघारी परतली. यानंतर स्मृती आणि जेमिमाने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण सुरू केलं, पण त्यानंतर स्मृती मंधानालाही पॅव्हेलियनमध्ये परत यावं लागलं.
ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोअर
पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून श्री चरिणी आणि दीप्ती शर्मा यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलला पोहोचेल. फायनलमध्ये विजेत्या टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.
