टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारताच्या या 'प्लेइंग 11' मध्ये अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर रन्सची मोठी जबाबदारी असेल. मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हे डावाला आकार देतील. ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
फिरकीची धुरा कुणाच्या खांद्यावर?
बॉलिंगचा विचार केला तर भारताकडे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान बॉलर्स असून त्यांना हर्षित राणा साथ देईल. फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि जडेजा यांच्या खांद्यावर असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट काढण्यासाठी हे बॉलर्स सज्ज आहेत. तर न्यूझीलंडकडे काईल जेमीसन सारखा अनुभवी बॉलर आणि आदित्य अशोक हा फिरकीपटू आहे, जे भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकतात.
नव्या चेहऱ्यांसह न्यूझीलंड मैदानात
न्यूझीलंड संघाने देखील आपला तगडा संघ जाहीर केला असून मायकेल ब्रेसवेल याच्याकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. पाहुण्या संघाकडून डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स डावाची सुरुवात करतील. मिडल ऑर्डरमध्ये डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स हे मोठे सिक्स मारण्यासाठी ओळखले जातात. मिचेल हे याच्याकडे विकेटकीपिंगची जबाबदारी असून, झॅकरी फॉल्क्स आणि ख्रिश्चन क्लार्क यांसारखे तरुण खेळाडू किवी संघाकडून खेळताना दिसणार आहेत.
न्यूझीलंड (खेळणारा संघ): डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकॅरी फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, आदित्य अशोक.
भारत (खेळणारा संघ): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
