'श्रेयस अय्यरचा मूर्खपणा'
रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल कॅच देऊन आऊट झाले, तर कर्णधार शुभमन गिल जेमिसनच्या स्विंग बॉलिंगवर बोल्ड झाला. पण श्रेयस अय्यरने खेळलेल्या शॉटवर न्यूझीलंडचे दिग्गज कॉमेंटेटर इयन स्मिथ यांनी बोचरी टीका केली आहे. श्रेयस अय्यरने खेळलेला हा शॉट स्टुपिड (मूर्खपणाचा) होता, असं इयन स्मिथ म्हणाले आहेत. टीमसाठी सावध खेळण्याची गरज असताना श्रेयस अय्यरने चुकीच्या वेळी चुकीचे शॉट मारल्याचे प्रकार याआधीही घडले आहेत, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या बॅटिंग अप्रोचवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
advertisement
विराट कोहली एका बाजूने सेट झालेला असताना श्रेयस अय्यरने एक-एक रन काढून त्याला स्ट्राईक द्यायला पाहिजे होती, पण क्रिस्टियन क्लार्कने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर श्रेयस अय्यर पूल शॉट मारायला गेला आणि मिड ऑनला उभ्या असलेल्या फोल्क्सला कॅच देऊन बसला.
3 वनडे मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच भारताने आणि दुसरी मॅच न्यूझीलंडने जिंकली, त्यामुळे सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आहे. आता सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीमला तिसरी वनडे जिंकावीच लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 337 रन केले. डॅरेल मिचेलने 137 आणि ग्लेन फिलिप्सने 106 रन केले. तर विल यंगने 30 आणि मायकल ब्रेसवेलने नाबाद 28 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हर्षीत राणा यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
