गिलकडे 3 लाख रुपयांचं मशीन
शुभमन गिल जवळपास 3 लाख रुपयांचं वॉटर प्युरिफिकेशन मशीन सोबत घेऊन इंदूरमध्ये आला आहे. हे मशीन गिलने त्याच्या हॉटेल रूममध्येच ठेवलं आहे. हे मशीन आरओ आणि सिल बंद बॉटलमध्ये असलेलं पाणीही पुन्हा शुद्ध करतं. इंदूरच्या भागीरथपुरा भागात दुषित पाण्यामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. गिलने हे मशीन शहरातल्या दुषित पाण्यापासून वाचण्यासाठी आणलं का? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
advertisement
बीसीसीआयने खेळाडूंचं फिटनेस आणि डाएटची काळजी घेण्यासाठी टीमसोबत एक शेफही पाठवला आहे. हा शेफ खेळाडूंच्या वैयक्तिक गरजांनुसार जेवण बनवणार आहे. विराट कोहलीला डाएटमध्ये उकडलेलं आणि वाफवलेलं अन्न लागतं. तर रोहितच्या डाएटमध्ये बदाम, स्प्राऊट, ओट्स, फळं, पनीर, भाज्या, डाळ आणि भाताचा समावेश आहे.
इंदूरमध्ये खराब पाण्याचं संकट
देशातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळवलेल्या इंदूरच्या भागीरथपुरा भागामध्ये खराब पाण्याने भयावह रूप घेतलं आहे. वेगवेगळ्या वृत्तांनुसार दुषित पाण्यामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बऱ्याच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, ज्यात काही जणांची प्रकृती गंभीर आहे. आयसीयूमधल्या एका रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आलं आहे. तर 3 रुग्ण बऱ्याच दिवसांपासून व्हॅन्टिलेटरवर आहेत. सध्या एकूण 16 जणांवर उपचार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये डायरियाचे काही रुग्णही आढळले आहेत.
