रवींद्र जडेजाच्या ऐवजी आयुष बदोनीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर आयुष बदोनीची टीम इंडियात निवड झाली आहे. ऑलराऊंडर असलेला आयुष बदोनी हा त्याच्या स्पिन बॉलिंगनेही योगदान देऊ शकतो. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा बदोनी कॅप्टन गिलसाठी सहावा बॉलिंग पर्याय ठरू शकतो. बदोनी व्यतिरिक्त डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगलाही संधी मिळू शकते.
advertisement
अर्शदीप सिंग हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. पण तरीही पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसावं लागलं होतं. अर्शदीपच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला प्राधान्य देण्यात आलं होतं, पण त्याला न्यूझीलंडच्या बॅटरना रोखण्यात अपयश आलं.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि विकेट कीपर केएल राहुल यांची टीममधली जागा निश्चित आहे. तसंच ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डीलाही आणखी एक संधी मिळेल. दुसऱ्या वनडेमध्ये 10 ओव्हरमध्ये 82 रन देऊनही कुलदीप यादवच्या स्थानाला कोणताही धोका नाही. पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. सीरिज जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, आयुष बदोनी, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
