15 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हर्षित राणाने स्ट्रेट ड्राईव्ह मारला, पण बॉल न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मॅट हेन्रीच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एन्डच्या स्टंपला जाऊन आदळला, त्यावेळी शिवम दुबे क्रीजमधून बाहेर पडला होता, त्यामुळे थर्ड अंपायरचा निर्णय यायच्या आधीच दुबे पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता.
न्यूझीलंडने दिलेल्या 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला, तर सूर्यकुमार यादव 8, हार्दिक पांड्या 2 आणि संजू सॅमसन 24, रिंकू सिंग 39 रनवर माघारी परतले होते. शिवम दुबेने मात्र एकट्याने न्यूझीलंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. शिवम दुबे बॅटिंगला असताना टीम इंडिया जिंकू शकते, असं वाटत होतं, पण दुबेची विकेट गेल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाच्या शेवटच्या आशाही मावळल्या.
न्यूझीलंडने उभारला डोंगर
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 215 रन केले. न्यूझीलंडचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्धचा हा दुसरा सगळ्यात मोठा स्कोअर आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने 36 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली, ज्यात 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डॅरेल मिचेलने 18 बॉलमध्ये नाबाद 39 रन केले. मिचेलने त्याच्या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 2 फोर मारल्या. डेवॉन कॉनवेनेही 23 बॉल 44 आणि ग्लेन फिलिप्सने 16 बॉल 24 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 आणि कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या. याशिवाय बुमराह आणि बिष्णोईला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
