थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यानंतर सूर्यकुमार यादवला आऊट दिलं. 8 बॉलमध्ये 8 रन करून सूर्यकुमार यादव आऊट झाला, या इनिंगमध्ये त्याने 2 फोर मारल्या होत्या. 216 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियासाठी हा दुसरा धक्का होता. याआधी ओपनर अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता.
न्यूझीलंडने उभारला डोंगर
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 215 रन केले. न्यूझीलंडचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्धचा हा दुसरा सगळ्यात मोठा स्कोअर आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने 36 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली, ज्यात 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डॅरेल मिचेलने 18 बॉलमध्ये नाबाद 39 रन केले. मिचेलने त्याच्या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 2 फोर मारल्या. डेवॉन कॉनवेनेही 23 बॉल 44 आणि ग्लेन फिलिप्सने 16 बॉल 24 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 आणि कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या. याशिवाय बुमराह आणि बिष्णोईला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने टीममध्ये एक बदल केला आहे. इशान किशनला विश्रांती देऊन अर्शदीप सिंगची टीममध्ये निवड केली गेली.
