प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सूरूवात खूपच चांगली झाली होती. न्यूझीलंडच्या डेवॉन कॉन्वे आणि टीम सिफर्टने धडाकेबाज फलंदाजी करून 8 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या होत्या. त्यानंतर डेवॉन कॉन्वे 44 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर रचिन रविंद्र 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन फिलिप्स मैदानात आला होता.
तिकेट टिम सिफर्ट पहिल्या बॉलपासून तुफान बॅटींग करत होता. पण नंतर तो देखील 36 बॉलमध्ये 62 धावा करून बाद झाला होता. न्यूझीलंडक़डून टिम सिफर्टनेच सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्स 24 वर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ मार्क चॅपमन 9 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर डेरी मिचेल आणि मिचेल सँटनर मैदानात होते.
दरम्यान 16 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मिचेल सँटनरच्या बॅटीला लागलेला बॉल शॉर्ट थर्ड मॅनच्या हातात गेला. या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी एक रन चोरण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने क्षणाचाही विलंब न करता नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो करून स्टम्प उडवले होते.पण सँटनर डाईव्ह मारून देखील पोहोचला नाही आणि रनआऊट झाला. तो रनआऊट झाल्याने न्यूझीलंडला आणखी जास्तीच्या धावा काढता आल्या नाही.
पुढे जाऊन डेरी मिचेलने 39 धावांची नाबाद खेळी करत न्यूझीलंडला 215 धावांपर्यंत नेले होते. पण ज्याप्रमाणे न्यूझीलंड सुरूवातीपासून फलंदाजी करत होती , ते पाहती ती 250 हून अधिक धावा ठोकू शकली असती. पण टीम इंडियाने न्यूझीलंडला 215 धावात रोखले.टीम इंडियाकडून अर्शदिप सिंह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 तर जसप्रीत बुमराह आणि रवि बिश्नोईने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
