काय म्हणाला अभिषेक शर्मा?
आजचा दिवस खूप साधा होता. पण पाकिस्तानचे खेळाडू ज्याप्रकारे काही कारण नसताना आमच्या अंगावर धावून आले, ते मला काही आवडलं नाही. म्हणूनच मी त्यांना बॅटने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे खेळाडू उगाच आमच्यावर येत होते, असं अभिषेक शर्मा म्हणाला आहे. जर तुम्ही पाहिलं तर कोणीही इतकं आक्रमक खेळत असेल, तर त्यामागे संघाचा पाठिंबा असतो. संघ माझ्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामुळेच मी या इराद्याने मैदानात उतरतो. मी खूप मेहनत करत आहे आणि जर तो माझा दिवस असेल, तर मी तो माझ्या संघासाठी जिंकेनच, असंही अभिषेक म्हणाला.
advertisement
आम्ही शाळेतले दोस्त
अभिषेकने त्याचा सहकारी शुबमन गिलसोबतच्या शतकी भागीदारीबद्दलही सांगितलं. आम्ही शाळेच्या दिवसांपासून एकत्र खेळत आहोत. आम्हाला एकमेकांसोबत मॅच खेळायला मजा येते. आज आम्ही हे करून दाखवण्याचा विचार केला होता आणि तो दिवस आज होता. शुभमन गिल ज्या पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देत होता, ते पाहून मला खूप आनंद झाला, असंही अभिषेकने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये म्हटलं.
कसा रंगला सामना?
दरम्यान, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांचा उभ्या केल्या. यामध्ये पाकिस्तानचा सलामीवीर साहबजादा फरहान याने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर कोणत्याही फलंदाजांना टीम इंडियाने मैदानात टिकू दिलं नाही. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाच्या सलामीवीरांनी सामना पारड्यात टाकला. शुभमन गिल आणि अभिषेके शर्मा यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला सुपर फोरमधील पहिला विजय मिळवून दिला.