हॅरिस रौफला अभिषेकचा चोप
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पावरप्लेमध्ये हॅरिस रौफ याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या खोड्या काढण्यासाठी पाकिस्तानची बॉलर्स सरसावले. हॅरिस रौफने सूर्यकुमार यादवची विकेट मिळाल्यानंतर हॅरिस उड्या मारायला लागला. पुढच्या ओव्हरमध्ये जेव्हा बॉन्ड्री लाईनवर गेला तेव्हा त्याने 6-0 ची साईन केली. याचा अर्थ पाकड्यांना असं वाटतंय की, भारतीय सैन्याचे सहा फायटर प्लेन पाकिस्तानने उडवले अन् भारताचं एकही फायटर प्लेन मारलं गेलं नाही. त्यावर हॅरिसने ही साईन केली. त्यावर भारतीयांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
advertisement
कोहली कोहलीचा जयघोष
हॅरिस जास्त उड्या मारत असल्याचं लक्षात आल्यावर भारतीय फॅन्सने कोहली कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू केला अन् हॅरिसला जमिनीवर आणलं. विराट कोहलीने हॅरिसला दोन सिक्स मारून पाकिस्तानची इज्जत काढली होती. हॅरिस रौफच्या या कृतीनंतर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मात्र, अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलं, ते पाहून भारतीयांचं मन खुश झालंय.
अभिषेक आणि हॅरिस यांच्या वाद
दरम्यान, हॅरिस रौफ टीम इंडियाच्या डावातील पाचवी ओव्हर टाकायला आला. रौफच्या ओव्हरमध्ये या सलामी जोडीने 12 धावा काढल्या. या दरम्यान अभिषेक आणि हॅरिस यांच्या वाद झाला. त्यावेळी अभिषेक शर्माने बोट दाखवणाऱ्या हॅरिसला आपल्या बॅटमधून उत्तर दिलं. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी धुंवाधार शतकीय भागेदारी केली अन् पाकिस्तानचा पराभव सोपा केला.