India vs Pakistan Rivalryमध्ये आज असा एक किस्सा सांगणार आहोत जो वाचल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2004 साली झालेल्या लढती टीम इंडियाच्या क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक लढतींपैकी एक आहेत. भारताचा संघ 2004 साली पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्याच्या आधी भारताने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर कधीच कोणत्याही मालिकेत पराभूत केले नव्हते.
advertisement
वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनचे पदार्पण अन् पाकिस्तानला लोळवलं;INDvsPAKची पहिलीच वनडे
भारतीय संघाने या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने झाली आणि पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. मात्र त्यानंतर सलग दोन लढती पाकिस्तानने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. चौथ्या सामन्यात टीम इंडियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. दोन्ही संघातील अखेरची लढत निर्णायक होती.
या सामन्यात अशी एक घटना घडली ज्याचा भारत किंवा पाकिस्तान नाही तर जगातील कोणत्याही क्रिकेटपटूने विचार केला नव्हता. तेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये शोएब अख्तर हा सर्वात वेगवान गोलंदाज होता. अख्तर प्रत्येक बॉल हा 140 पेक्षा अधिक वेगाने टाकायचा. त्यामुळे फलंदाजांच्या मनात त्याच्याबद्दल दहशत होती. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना त्याने अनेकदा अडचणीत आणले होते.
पाचवी वनडे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. कारण जो ही मॅच जिंकले तो मालिका जिंकणार होता. पाकिस्तानने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीसाठी बोलवले. भारताची सुरुवात फार चांगली झाली नसली तरी लक्ष्मणने 107 धावांची शतकी खेळी केली. अखेरच्या काही षटकात भारताचे तळातील फलंदाज मैदानावर होते. जास्ती जास्त धावा करणे एवढेच लक्ष्य भारतासमोर होते.
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
इरफान पठाण आणि लक्ष्मीपती बालाजी हे दोघे फलंदाजी करत होते. भारताच्या डावातील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी अख्तर आला आणि बालाजीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. बालाजीचा हा षटकार अख्तरसाठी कानफाडात मारल्यासारखा होता. क्रिकेट विश्वात अख्तरचा दरारा इतका होता की, त्याला षटकार मारणे ही सोपी आणि साधी गोष्ट नव्हती. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बालाजीने पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले.
नेटफ्लिक्सवर Greatest Rivalry: India vs Pakistan ही डॉक्यूमेंट्रीमध्ये स्वत: शोएब अख्तरने ही गोष्ट मान्य केली आहे की, बालाजीने मला प्रचंड त्रास दिला. मी जेव्हा जेव्हा त्याला बॉल टाकला तेव्हा तेव्हा तो माझी धुलाई करायचा. बालाजी हा माझ्या आयुष्यातील Nightmare होता. बालाजीच्या या कामगिरीवर भारतीय संघातील खेळाडूंना धक्का बसला होता. अश्विनने त्याला याबद्दल विचारले असता, बालाजी म्हणाला, मला बॉल दिसत नव्हता. मी फक्त थोडे बाजूला येऊन बॅट फिरवत होतो. अर्थात ही बालाजीने शोएबचा समाचार घेण्याची ही पहिली वेळ नव्हती. त्याआधी पेशावर येथे झालेल्या तिसऱ्या वनडेत बालाजीने अख्तरला सलग 2 चौकार मारले होते.
सचिन तेंडुलकर शाळेतील मुलासारखा रडला, Pain Killer घेऊन झळकावले होते शतक
बालाजीच्या या खेळीवर विरेंद्र सेहवाग म्हणाला, त्या मालिकेत बालाजीने कमाल केली. तो संघात नवा होता आणि कोणी त्याच्याकडून इतकी अपेक्षा केली नव्हती. आम्ही नंतर शोएब अख्तरला चिडवायचो की, तू कसला फास्ट बॉलर आमचा तर 11वा खेळाडू देखील तुला सिक्स मारतो. या दौऱ्यात नेतृत्व करणाऱ्या गांगुलीने देखील बाजालीचे कौतुक केले.
पाकिस्तानविरुद्धच्या त्या मालिकेत बालाजीने दुसऱ्या वनडेत 10 चेंडूत 13 धावा (3 चौकार) तिसऱ्या वनडेत 12 चेंडूत 21 धावा (3 चौकार, 1 षटकार), पाचव्या वनडेत 6 चेंडूत 10 धावा (1 षटकार) आणि एकूण 5 विकेट घेतल्या होत्या. 5व्या वनडे भारताने 40 धावांनी विजय मिळवत मालिका 3-2 अशी जिंकली. पाकिस्तानच्या भूमीवर एखादी मालिका जिंकण्याची ती पहिली वेळ होती.