जेमिमा रोड्रिग्जने 32 तर प्रतिका रावलने 31 रनची खेळी केली. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप-8 पैकी कर्णधार हरमनप्रीत कौर (19 रन) वगळता प्रत्येक खेळाडूने 20 पेक्षा जास्त रन केले, पण एकालाही अर्धशतक करता आलं नाही. एकाही अर्धशतकाशिवाय केलेला 247 रन हा स्कोअर महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातला चौथा सर्वाधिक स्कोअर आहे.
advertisement
पहिल्यांदाच ऑलआऊट
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पहिल्यांदाच ऑलआऊट झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या महिला टीममध्ये आतापर्यंत 11 वनडे मॅच झाल्या आहेत, यातल्या सर्व 11 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही महिला टीम 4 वेळा समोरासमोर आल्या आहेत, यातल्या सर्व 4 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पाकिस्तानच्या महिला टीमला भारताविरुद्ध एकदाही 200 रनचा टप्पा ओलांडता आलेला नाही, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर पाकिस्तानला इतिहास घडवावा लागेल.
टीम इंडियाचे 173 डॉट
या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 173 बॉलवर एकही रन केली नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमधले एका इनिंगमधले हे सर्वाधिक डॉट बॉल आहेत. तर जानेवारी 2023 नंतर 34 वनडेमध्ये भारतीय महिला टीमने दुसऱ्यांदा इतके डॉट बॉल खेळले. याआधी मागच्या वर्षी अहमदाबादमध्ये टीम इंडियाने 181 डॉट बॉल खेळले होते, न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा 183 वर ऑलआऊट झाला होता.