कधीकाळी वर्ल्ड क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा आता कोणत्याही संघाकडून सहज पराभव होतोय. पाकिस्तान संघाची भारताविरुद्धची लढत कायम चुरशीची होत असली तरी सध्या यात भारताचे वर्चस्व दिसत आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
नुकत्याच पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघ भारताविरुद्ध केवळ 241 धावांचे आव्हान उभं करू शकला. भारतीय संघाने हे लक्ष्य 42.2 षटकांतच 4 गडी गमावून सहज पार केलं. या विजयात विराट कोहलीच्या शतकाने मोठी भूमिका बजावली.
advertisement
पराभवानंतर पाकिस्तान संघावर टीका
या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानमधील माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. या पराभवामुळे पाकिस्तान संघ थेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.
सचिन तेंडुलकर शाळेतील मुलासारखा रडला, Pain Killer घेऊन झळकावले होते शतक
सकलेन मुश्ताकने भारताला दिले चॅलेंज
एका बाजूला पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चा करायची सोडून भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांनी भारताला थेट खुले आव्हान दिले आहे. पाकिस्तानच्या 24 न्यूज एचडी या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान सकलेन म्हणाला, राजकीय गोष्टी बाजूला ठेवूयात. असे असेल आणि भारताचे खेळाडू खरचं चांगले खेळत असती जर भारत खरोखरच एक उत्तम संघ असेल, तर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 10 टेस्ट, 10 वनडे आणि 10 T20 सामने खेळावेत. मग सर्व गोष्टी क्लिअर होतील. सकलेनने हे वक्तव्य केले तेव्हा त्या शोमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकही देखील होता. मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सतत कर्णधार बदलणे, निवड समितीतील वाद, बोर्डाच्या निर्णयांतील अस्थिरता यामुळे पाकिस्तान संघात सुसूत्रता राहिलेली नाही. जर आपण योग्य पद्धतीने तयारी केली आणि संघाला योग्य दिशा दिली, तर आम्ही जगभरातील संघांविरुद्ध चांगली कामगिरी करू शकतो, अगदी भारतालाही पराभूत करू शकतो, असेही सकलेन म्हणाला.
अख्तरला ठोकून काढायचा टीम इंडियाचा गोलंदाज; शोएब आयुष्यातील तो Nightmare कोण?
BCCI कडून कोणताही प्रतिसाद नाही!
सकलेन मुश्ताकच्या या आव्हानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय मालिका खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती त्यासाठी अनुकूल नाही.
भारत-पाकिस्तान मालिका होईल का?
आता BCCI पाकिस्तानच्या या खुल्या आव्हानाला प्रतिसाद देतं का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच रोमांचक असतो, पण सध्या दोन्ही देश फक्त ICC स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे द्विपक्षीय मालिका कधी खेळली जाईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.