खरं तर साखळी फेरीतील सामन्यात पंच अँडी पायक्राफ्टच्या आदेशानंतर टॉस दरम्यान भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाला हॅन्डशेक करण्याचे टाळण्यास सांगितले होते. त्यानंतर सामना जिंकल्यानंतर देखील भारताने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक टाळला होता. खरं तर पाकिस्तान खेळाडू वाट पाहत होते, पण भारतीय संघाने थेट ड्रेसिंग रूम गाठली होती.त्यामुळे पाकिस्तान रागाने लालबुंद झाला होता.
advertisement
भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान संघाने खूप आकाडतांडव केला होता. पाकिस्तानने पंच अँडी पायक्राफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने त्यांची ही मागणी फेटाळून लावत मोठा धक्का दिला होता. यासोबत भारताने नियमाचा भंग केल्याचा आरोप करत कारवाईचीही मागणी केली होती.पण अद्याप तरी भारतावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे.
दरम्यान आज पुन्हा सुपर 4 मध्ये हे दोन संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा हँडशेकवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान संघ हा हँडशेक करण्यावरून आग्रही राहणार आहे.भारताने यावेळी कितीही नकार दिला तरी पाकिस्तान अडूनच राहणार आहे. त्यामुळे नाईलाजास्तवर जर भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवला हँडेशक करायला लावला तर भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आहे. पण जर या विपरीत घडल्यास चाहत्यांना नक्कीच आवडेल.त्यामुळे आजच्या सामन्यात नवीन काय ड्रामा घडतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारताचा संघ - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा संघ - सलमान अली आगा (कॅप्टन), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रॉफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफियान मोकीम.