साहिबजादाला पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर त्याने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. त्यानंतर त्याने आक्रामक फलंदाजी सूरूच ठेवली.यानंतर अर्धशतकाजवळ असताना त्याने सिक्स ठोकून आपलं अर्धशतक पु्र्ण केलं. हे अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने वादग्रस्त सेलिब्रेशन केलं आहे. साहिबजादाने बॅटला बंदुकीच्या स्टाईलमध्ये पकडत सेलिब्रेशन केलं होतं.त्यामुळे या सेलिब्रेशनच्या माध्यमातून त्याने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
साहिबजादाला 4 धावांवर मिळालं जीवनदान
टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने गोलंदाजीला सूरूवात केली होती.यावेळी पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मोठी चूक घडली आहे. पाकिस्तानच्या साहिबजादाने मारलेला बॉल थेट बाऊंन्ड्री लाईनवर उभ्या असलेल्या अभिषेक शर्माच्या हातात गेला होता.पण त्याने हा महत्वाचा कॅच ड्रॉप केल्या.त्यानंतर हार्दिक पांड्या प्रचंड भडकला होता. त्यामुळे टीम इंडियाकडून मोठी चूक घडली.ही चूक टीम इंडियाला महागात पडणार आहे.
साहिबजादा 4 धावांवर खेळत असताना त्याची कॅच ड्रॉप झाली होती.त्यामुळे तो आता या मिळालेल्या जीवनदानाचा किती फायदा घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान यानंतर दुसर्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने फखर जमानची विकेट घेतली होती. फखर जमान विकेटमागे कॅच आऊट झाला. त्याने 15 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर आता मैदानात सयम अयुब आला आहे.
दरम्यान पाकिस्तानने आपल्या 4 विकेट गमावून 100 धावा पुर्ण केल्या आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला साहिबजादा 58 धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान बॅकफुटवर गेली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा,
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (डब्ल्यू), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद