खरं तर अभिषेक शर्माने सामन्याच्या पहिल्याच बॉलवर शाहिन आफ्रिदीला सिक्स ठोकीन आक्रामक सूरूवात केली होती. त्यानंतर शुभमन गिलही कुठे मागे राहणार होता,त्याने धडाकेबाज खेळी सूरू केली होती. या दरम्यान शाहीन आफ्रिदीला लागोपाठ फोर मारताच गिलचा त्याच्यासोबत राडा झाला होता.यावेळी शुभमन गिलने शाहीनकडे पाहिले आणि हाताने चेंडू कुठे गेला याचा इशारा केला होता.त्यामुळे मोठा राडा झाला.
advertisement
हा राडा कुठे शांत होईल असे वाटत असतानाच अभिषेक शर्मा पेटून उठला होता. तो एकामागून एक वादळी खेळी करत होता. या दरम्यान हॅरीस रौफ पाचवी ओव्हर घेऊन मैदानात आला होता.यावेळी शुभमन गिलने रौफच्या शेवटच्या बॉलवर फोर मारताच मोठा वाद झाला. या वादात हॅरीफ रौफ ही शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या दिशेने धावत गेला.त्यानंतर हे दोन्ही भारतीय खेळाडू देखील रोफच्या दिशेने धावले होते. यावेळी खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा,
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (डब्ल्यू), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद