रूम बंद करा, फोन स्विच ऑफ करा
ओमानविरुद्धच्या विजयानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, रूम बंद करा, फोन स्विच ऑफ करा आणि झोपा. अर्थात, हे नेहमीच शक्य होत नाही, कारण तुम्ही अनेक मित्रांना भेटता, डिनरसाठी जाता. त्यामुळे हे कठीण आहे, पण शेवटी तुम्हाला काय ऐकायचं आहे आणि काय लक्षात ठेवायचं आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे, असं म्हणत सूर्याने कडक शॉट मारला.
advertisement
चांगली कामगिरी करायची असेल तर...
सूर्यकुमार पुढे म्हणाला, "एक गोष्ट स्पष्ट आहे की जर तुम्हाला या टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करायची असेल, तर तुम्हाला बाहेरचे आवाज दुर्लक्षित करावे लागतील. आणि फक्त त्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत, असं म्हणत बाहेरच्या लोक काय म्हणतात यावर लक्ष देऊ नका, असं सूर्याने खेळाडूंना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कधीकधी एखादी चांगली गोष्ट...
दरम्यान, मी असं म्हणणार नाही की सगळ्याच गोष्टी पूर्णपणे दुर्लक्षित करणं योग्य आहे, पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत, त्या स्वीकारण्यात काहीच अडचण नाही. कधीकधी एखादी चांगली गोष्ट तुम्हाला मदत करू शकते. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की सगळेच खूप चांगल्या स्थितीत आहेत, असंही सूर्यकुमार यादव यावेळी म्हणाला आहे.