वर्ल्ड कपचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने टॉसचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हस्तांदोलन नाही
भारत-पाकिस्तानच्या कर्णधारांनी या सामन्यातही हस्तांदोलन केलं नाही. याआधी आशिया कपमध्येही टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघासोबत हस्तांदोलन केलं नव्हतं. तसंच भारतीय टीमने पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी याच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला होता. आशिया कप जिंकूनही भारतीय टीम ट्रॉफीशिवाय परत आली.
2011 वर्ल्ड कपमध्ये दोनदा टॉस
याआधी 2011 च्या पुरुष वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनदा टॉस झाला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या फायनलमध्ये धोनीने नाणे फेकले, पण चाहत्यांचा आवाज इतका जास्त होता की कुमार संगकारा काय म्हणाला, हेच मॅच रेफरी जेफ क्रो यांना समजलं नाही, त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी पुन्हा एकदा टॉसला सहमती दर्शवली आणि पुन्हा एकदा टॉस झाला. यानंतर संगकाराने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवून दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव
महिला वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. 30 सप्टेंबरला झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा 59 रननी पराभव करून भारताने वर्ल्ड कपची विजयी सुरूवात केली. गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या 271 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 45.4 ओव्हरमध्ये 211 रनवर ऑलआऊट झाला. 53 रन केल्यानंतर 3 विकेट घेणारी दीप्ती शर्मा सामनावीर ठरली.
दुसरीकडे पाकिस्तानला मात्र पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा धक्का बसला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या महिला टीमला फक्त 129 रन करता आल्या, त्यानंतर बांगलादेशने 31.1 ओव्हरमध्ये फक्त 3 विकेट गमावून हे आव्हान पार केलं.