या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताचा 50 ओव्हरमध्ये 247 रनवर ऑल आऊट झाला. हरलीन देओलने भारताकडून सर्वाधिक रन केले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना हरलीनने 65 बॉलमध्ये 46 रन केले. याशिवाय आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिचा घोषने 20 बॉलमध्ये नाबाद 35 रन करून भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. जेमिमा रोड्रिग्जने 32 तर प्रतिका रावलने 31 रनची खेळी केली. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप-8 पैकी कर्णधार हरमनप्रीत कौर (19 रन) वगळता प्रत्येक खेळाडूने 20 पेक्षा जास्त रन केले, पण एकालाही अर्धशतक करता आलं नाही.
advertisement
रेकॉर्ड अबाधित
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पहिल्यांदाच ऑलआऊट झाला, पण भारताचं पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं रेकॉर्ड अबाधित राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या महिला टीममध्ये आतापर्यंत 12 वनडे मॅच झाल्या आहेत, यातल्या सर्व 12 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही महिला टीम 5 वेळा समोरासमोर आल्या आहेत, यातल्या सर्व 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पाकिस्तानच्या महिला टीमला भारताविरुद्ध एकदाही 200 रनचा टप्पा ओलांडता आलेला नाही, या सामन्यातही पाकिस्तानला भारतासमोर 200 रन करता आल्या नाहीत.