22 वर्षांचा नितीश कुमार रेड्डी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमचा भाग आहे, पण कोलकाता टेस्टआधी त्याला वगळण्यात आलं आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध खेळायला पाठवण्यात आलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार नितीशने अनधिकृत वनडे सीरिजमध्ये खेळत राहावं, अशी टीम मॅनेजमेंटची इच्छा होती. पहिल्या सामन्यात नितीशने 37 रन केल्या आणि 18 रन देऊन 1 विकेट घेतली, पण दुसऱ्या सामन्यात त्याला बॅटिंग आणि बॉलिंगची संधी मिळाली नाही. या सीरिजमध्ये इंडिया ए ने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
advertisement
मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण केल्यापासून, नितीशने 9 टेस्ट मॅच खेळल्या आहेत आणि 29.69 च्या सरासरीने 386 रन केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे, तसंच त्याने 8 विकेटही घेतल्या आहेत.
गिलला विमान प्रवासाला बंदी
दरम्यान, भारतीय टेस्ट टीम बुधवारी दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी गुवाहाटीला रवाना होणार आहे. पण पीटीआयच्या वृत्तानुसार, गिलला त्याच्या मानेला दुखापत झाल्यामुळे उड्डाण न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गिलला तीव्र मानदुखी आहे, त्याच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती द्यायची परवानगी आम्हाला नाही, त्याला सतत गळ्यात पट्टा घालावा लागणार आहे, असं बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं आहे.
'त्याला तीन-चार दिवस विश्रांती घेण्याचा आणि उड्डाण न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो गुवाहाटीला प्रवास करू शकत नाही. आम्ही दररोज त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहोत. मंगळवारपर्यंत चित्र स्पष्ट होईल', असंही बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताचा 30 रननी पराभव झाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
