TRENDING:

IND vs SA : आफ्रिकेच्या स्पिनरसाठी गंभीरचं नवीन 'टेकनिक', टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना स्पेशल टास्क!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, यानंतर आता सीरिज वाचवण्यासाठी भारतीय टीमकडे वेळ कमी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, यानंतर आता सीरिज वाचवण्यासाठी भारतीय टीमकडे वेळ कमी आहे. इडन गार्डनवरच्या स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय बॅटिंग पुन्हा एकदा गडगडली. आता गुवाहाटीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टआधी प्रशिक्षक गौतम गंभीर बॅटिंग सुधारण्यासाठी शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करत आहे.
आफ्रिकेच्या स्पिनरसाठी गंभीरचं नवीन 'टेकनिक', टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना स्पेशल टास्क!
आफ्रिकेच्या स्पिनरसाठी गंभीरचं नवीन 'टेकनिक', टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना स्पेशल टास्क!
advertisement

कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाला स्पिन बॉलिंगविरुद्ध संघर्ष करावा लागला. यानंतर साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी सोमवारी नेटमध्ये स्पिनर बॉलरविरुद्ध एकच पॅड घालून जवळपास तीन तास सराव केला. टीम इंडियासाठी हा ऑप्शनल नेट सेशन होता, ज्यात साई सुदर्शन उजव्या पायाचे पॅड काढून सराव करत होता. पहिल्या टेस्टमध्ये साई सुदर्शन प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता, पण गुवाहाटीमध्ये तो खेळणार का नाही? याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

advertisement

डावखुरे स्पिन बॉलर आणि ऑफ स्पिनरविरुद्ध पुढच्या पायाच्या पॅडशिवाय सराव करण्याची पद्धत भारतीय क्रिकेटमध्ये जुनी आहे. पायाला दुखापत होऊ नये म्हणून बॅटर त्याच्या पुढच्या पॅडऐवजी बॅटने खेळण्याचा जास्त प्रयत्न करतो. या सरावाचं आणखी एक कारण म्हणजे भारतीय खेळाडू बॅटिंग करताना जास्त वेळा बॅकफूटवर जातात. या सरावामुळे त्यांना स्पिनरना पुढे खेळण्यास मदत मिळते.

advertisement

सुदर्शनप्रमाणेच जुरेलनेही एक पॅड काढून सराव केला. पहिल्या टेस्टमध्ये जुरेल स्पेशलिस्ट बॅटर म्हणून खेळला होता, पण त्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. गुवाहाटीमध्ये जुरेलला संधी मिळणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नेट सेशनवेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने साई सुदर्शनवर बारीक लक्ष ठेवलं, कारण गिल दुखापतीतून बरा झाला नाही, तर साई सुदर्शनला खेळण्याची संधी मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर गडगडले, सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

मानेच्या दुखापतीमुळे भारतीय कर्णधार शुभमन गिलला दुसऱ्या टेस्टमधून बाहेर बसावे लागू शकते. साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी स्पिनरसोबतच फास्ट बॉलरविरुद्धही सराव केला, पण त्यांच्याविरुद्ध दोघंही कम्फर्टेबल दिसले नाहीत. आकाशदीपचा चेंडू अनेक वेळा त्याच्या बॅटच्या एजला लागला आणि नेट बॉलरनीही त्यांना बॉल स्विंग करून त्रास दिला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेच्या स्पिनरसाठी गंभीरचं नवीन 'टेकनिक', टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना स्पेशल टास्क!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल