India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियममध्ये सूरू असलेल्या सामन्यात टीम इंडियासमोर 548 धावांच लक्ष्य आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर 2 विकेट गमावून 27 धावा केल्या होत्या.त्यामुळे पाचव्या दिवशी भारताला 522 धावा करायच्या आहेत. या धावा करणे अशक्यच आहे.त्यामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहेत.या दरम्यान एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.यात साऊथ आफ्रिकेच्या दिग्गजाने भन्नाट किस्सा सांगितला आहे.हा किस्सा ऐकूण तुम्हाला देखील भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.
advertisement
खरं तर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील टेस्ट सामन्यात आफ्रिकेचे अनेक खेळाडू समालोचन करण्यासाठी देखील भारतात आले आहे. आफ्रिकेकडून समाचोलन करण्यासाठी डेल स्टेन भारतात आला होता. यावेळी समालोचन करून भारतीय रस्त्यावरून घरी परतत असताना त्याच्यासोबत एक किस्सा घडला होता. तो किस्सा त्याने आता लाईव्ह सामन्यात ऐकवला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत डेल स्टेन सांगतो, काल रात्री मी इथून निघालो तेव्हा रस्त्याच्या कडेला एक विक्रेता टेस्ट टी-शर्ट विकत होता. मी त्याच्याकडे गेलो आणि टी शर्टची किंमत विचारली, तेव्हा त्याने सांगितले की ते तुमच्यासाठी मोफत आहे. आणि त्याने माझ्या 6 महिन्यांच्या मुलासाठी 77 क्रमांकाची जर्सी (शुभमन गिल) दिली. आज रात्री धुवायला दिल्यानंतर, माझ्या मुलाला गिलच्या पांढऱ्या जर्सीमध्ये पाहायला मिळेल, असे त्याने सांगितले. एकंदरीत काय तर डेल स्टेन या घटनेने भारावून गेला.
तसेच त्या विक्रेत्याने डेल स्टेनला मोफत टी शर्ट देऊन अतिथी देवो भव:चा मान राखला. अतिथी देवो भव म्हणजे पाहुण्यांचा सत्कार करून त्या विक्रेत्याने त्याचा मान राखला आहे. विशेष म्हणजे हा सगळा किस्सा त्याने लाईव्ह सामन्यात सांगितला आहे.त्यामुळे 140 कोटी जनतेची छाती अभिमानाने ताठ झाली होती.
