TRENDING:

Virat Kohli : विराट-गंभीरचा वाद टोकाला, सीरिज जिंकली पण एका Video ने मजा खराब केली!

Last Updated:

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातले वाद टोकाला पोहोचले आहेत का? याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 270 रनचं आव्हान टीम इंडियाने फक्त 1 विकेट गमावून 39.5 ओव्हरमध्येच पार केलं. यशस्वी जयस्वालने त्याच्या वनडे करिअरमधलं पहिलं शतक झळकावलं. जयस्वालने 121 बॉलमध्ये नाबाद 116 रन केले, ज्यात 12 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय रोहित शर्माने 75 आणि विराट कोहलीने नाबाद 65 रन केले.
विराट-गंभीरचा वाद टोकाला, सीरिज जिंकली पण एका Video ने मजा खराब केली!
विराट-गंभीरचा वाद टोकाला, सीरिज जिंकली पण एका Video ने मजा खराब केली!
advertisement

सीरिजच्या पहिल्या दोन्ही सामन्यात शतकं आणि शेवटच्या सामन्यात अर्धशतक केलेल्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. तर रोहित शर्माने या सीरिजमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकं केली. सीरिजच्या सुरूवातीपासूनच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे कोच गौतम गंभीरसोबत खटके उडत असल्याची वृत्त समोर आली होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा गौतम गंभीरसोबत बोलत नसल्याची चर्चाही सुरू होती, त्यातच आता टीम इंडियाने सीरिज जिंकल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

advertisement

सीरिज जिंकल्यानंतर विराट कोहली टीम इंडियातल्या सर्व सदस्यांसोबत हसत हस्तांदोलन करत होता, तर रोहित शर्मा समोर आल्यानंतर विराटने त्याला मिठी मारली. पण गौतम गंभीर समोर आल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसले नाहीत, तसंच नुसतं हस्तांदोलन करून विराट पुढे निघून गेला.

भारताने मालिका जिंकली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, पण त्यानंतर रायपूरमध्ये झालेली दुसरी वनडे भारताने गमावली, त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला तिसरी वनडे जिंकणं गरजेचं होतं. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला 270 रनवर ऑलआऊट केलं. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 106 रनची खेळी केली. या विजयासोबतच भारताने 3 वनडे मॅचची सीरिज 2-1 ने जिंकली आहे. आता दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : विराट-गंभीरचा वाद टोकाला, सीरिज जिंकली पण एका Video ने मजा खराब केली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल