गंभीरचा ऑलराऊंडर पॅटर्न मोडला
गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतर गंभीरने ऑलराऊंडर खेळाडूंना संघात घेण्याचा पॅटर्न तयार केला होता. कसोटी असो वा वनडे मॅच.. गंभीर आपल्या रणनितीवर कायम राहिला अन् प्रॉपर बॅटरला संघाबाहेर बसवून त्याने ऑलराऊंडर्सला संधी दिली. अशातच आता केएल राहुलला वनडे संघाची कॅप्टन्सी दिल्यानंतर आता केएलने गंभीरचा पॅटर्न चेंज केलाय.
advertisement
तिलक वर्माला संधी
पहिल्या दोन वनडे सामन्यात प्लेइंग इलेव्हन निवडताना केएल राहुलने वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली होती. अशातच अखेरच्या सामन्यात केएल राहुलने आपली चूक सुधारली असून तिलक वर्माला संघात सामील करून घेतलं आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑलराऊडर पॅटर्न बाजूला ठेवला असून प्रॉपर पाच बॉलरसह टीम इंडिया मैदानात उतरेल. रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर बॉलिंगची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
धोनीचा पॅटर्न आणला
तर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली यांच्यावर टॉप ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. तसेच ऋतुराज गायकवाड, तिळक वर्मा आणि केएल राहुल मिडल ऑर्डरमध्ये कमाल दाखवतील. त्यामुळे सहा बॅटर आणि पाच बॉलर खेळवण्याचा धोनीचा पॅटर्न केएल राहुलने संघात आणलाय.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिळक वर्मा, केएल राहुल (C), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
