TRENDING:

VIDEO : 'जा ना तुझ्या जागेवर...', LIVE सामन्यात कॅप्टन राहुल भडकला कोहलीवर, रोहितसमोरच राडा, नेमकं काय घडलं?

Last Updated:

भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी या सामन्यात मोठा राडा झाला आहे.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
KL Rahul Virat Kohli Viral Video : विशाखापट्टणच्या मैदानावर करो या मरोचा सामना भारताने 9 विकेटने जिंकला आहे. साऊथ आफ्रिकेने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य 39.5 ओव्हरमध्ये गाठत हा सामना 9 विकेटने जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिका 2-1 जिंकली आहे. भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी या सामन्यात मोठा राडा झाला आहे.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
kl rahul ignore virat kohli suggestion
kl rahul ignore virat kohli suggestion
advertisement

खरं तर 45 ओव्हर दरम्यान एक घटना घडली आहे. या घटनेत भारताला साऊथ आफ्रिकेला ऑल आऊट करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता होती.त्यावेळेस के एल राहुल खेळाडूंची फिल्डिंग लावत होता. त्याचवेळेस विराट कोहली त्याच्याजवळ आला होता, या दरम्यान राहुल आणि केएल राहुलमध्ये थोडा वाद झाला होता.

विराट कोहली राहुलला फिल्डिंग लावण्यासाठी मदत करत होता. या दरम्यान विराटने त्याला सल्लाही दिला. ओव्हरचे दोनच बॉल उरले आहेत त्यामुळे दोन स्लिप लाव ना असे विराट राहुलच्या जवळ येऊन बोलला. यावर राहुल त्याच्या सल्ल्याशी सहमत नसल्याचे दिसले आणि त्याला जा ना तुझ्यावर जागेवर असे बोलताना दिसले.त्यामुळे राहुलने एकतर त्याचा सल्ला तर ऐकलाच नाही आणि त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागला.या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून अनेकजण केएल राहुलवर प्रचंड टीका करत आहेत. तसेच राहुलने विराटसोबत असं वागलं नाही पाहिजे,असेही चाहते म्हणत आहेत.

कसा रंगला सामना

साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने धमाकेदार सूरूवात केली होती. भारताने हे लक्ष्य अवघ्या 40 ओव्हरमध्ये गाठत हा सामना 9 विकेटसने जिंकला आहे. भारताकडून रोहित शर्माने 75 धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर यशस्वी जयस्वाल 116 धावांवर नाबाद राहिला आणि विराट कोहली 65 धावांवर नाबाद राहिला.अशाप्रकारे भारताने हा सामना 9 विकेटने जिंकला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

साऊथ आफ्रिका प्रथम फलंदाजी करताना 270 धावांवर ऑलआऊट झाला होता.साऊथ आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 106 धावांची शतकीय खेळी केली होती. या सामन्यात डिकॉकने 6 षटकार आणि 8 चौकार मारले आहेत.डिकॉकसोबत टेम्बा बावुमाने 48 धावांची खेळी केली होती. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 4 विकेटस घेतल्या आहेत. तर अर्शदिप सिंह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'जा ना तुझ्या जागेवर...', LIVE सामन्यात कॅप्टन राहुल भडकला कोहलीवर, रोहितसमोरच राडा, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल