खरं ही घटना 43 व्या ओव्हर दरम्यान घडली आहे. कुलदीप यादवने या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर कॉर्बिन बॉशला कॉट अॅड बोल्ड केले होते.त्यानंतर याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर त्याने लुंगी एनगिडीला एलबीडब्ल्यू करण्याचा प्रयत्न केला.पण अंपायरने त्याला नाबाद दिले होते. त्यामुळे शेवटी त्याच्याकडे डिआरएसचा पर्याय उरला होता.त्यामुळे कुलदीप राहुलकडे बधून बोलतो, भाई घ्या ना, 2 डिआरएस तर बाकी आहेत.(भाई ले लो ना, 2 डिआरएस बाकी आहे)
advertisement
रोहित उगाच भडकत नाही, मॅचनंतर कुलदीप यादव DRSवर स्पष्टच बोलला, VIDEO आला समोर
कुलदीपच्या या मागणीवर कॅप्टन राहुल रोहित शर्माकडे बघतो आणि हसत सुटतो. आणि पुढे म्हणतो अरे बॉल विकेटच्या जवळपास पण नाही आहे.शेवटी रोहित शर्मा त्याला हातवारे करत म्हणतो जा बॉल टाक,त्याच्यानंतर कुलदीपचा चेहरा पूर्णपणे उतरतो.नंतर रोहित पुढे म्हणते काय सारखं सारखं आऊट आणि तो हसत सुटतो त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीला देखील आपलं हसू आवरता येत नाही आणि तिकडे काँमेंट्री बॉक्समध्ये देखील सगळे हसत सुटतात.
या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि या व्हिडिओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरता येत नाही आहे.
