टीम इंडियाच्या बॅटिंगची जबाबदारी विराट कोहलीवर असेल ज्याने मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये शतक ठोकलं आहे. गिलच्या गैरहजेरीत टीमचं नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलने भारताला पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवून दिला, पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केलं. दुसऱ्या सामन्यात विराटसोबतच ऋतुराज गायकवाडनेही शतक ठोकलं होतं.
टीम इंडियात बदल होणार?
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये संघर्ष करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसवलं जाऊ शकतं, त्याच्याऐवजी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. पंत टीममध्ये आल्यामुळे टीमला डेथ ओव्हरमध्ये आवश्यक असलेला अनुभवी बॅटर मिळेल. पंतला संधी मिळाली नाही, तर तिलक वर्माचा पर्यायही उपलब्ध आहे. तिलक वर्माने त्याची शेवटची वनडे जवळपास 2 वर्षांपूर्वी डिसेंबर 2023 साली खेळली होती.
advertisement
टीम इंडियाच्या बॉलिंगमध्ये बदल व्हायची शक्यता कमी आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या प्रसिद्ध कृष्णाऐवजी नितीश कुमार रेड्डीचा विचार केला जाऊ शकतो. कृष्णाने दुसऱ्या सामन्यात बऱ्याच रन दिल्या होत्या. रेड्डी टीममध्ये आला तर भारताची बॅटिंग आणखी मजबूत होऊ शकते. तसंच कर्णधार केएल राहुलला फास्ट बॉलिंगचा तिसरा पर्यायही मिळेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका मात्र त्यांच्या टीममध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत, केएल राहुल (कर्णधार/विकेट कीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, टेम्बा बऊमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्जकी, टोनी डि झोरजी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जेनसन, कॉरबिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
