गावसकरांकडून जितेशचं कौतुक
मॅचच्या चौथ्या बॉललाच विकेट मिळाल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर यांनी विकेट कीपर जितेश शर्माचं कौतुक केलं. या विकेटचं श्रेय अर्शदीपला नाही तर जितेश शर्माला असल्याचं गावसकर म्हणाले. रिझा हेन्ड्रिक्सच्या पॅडला बॉल लागल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी अपील केलं, पण डीआरएस घ्यायचा का नाही? याबाबत अर्शदीप आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव गोंधळात होते, पण विकेट कीपर जितेश शर्माला मात्र विश्वास होता आणि त्याने सूर्यकुमार यादवला डीआरएस घ्यायला लावला, यानंतर थर्ड अंपायरने रिझा हेन्ड्रिक्सला आऊट दिलं.
advertisement
गावसकर अर्शदीपवर नाराज
दरम्यान अर्शदीपच्या पुढच्याच ओव्हरमध्ये गावसकर त्याच्यावर नाराज झाले. डेवाल्ड ब्रेविसच्या बॅटला बॉल लागल्यानंतर पॅडला लागला, यानंतर अर्शदीपने सूर्यकुमार यादवला डीआरएस घ्यायचा आग्रह केला, त्यानंतर सूर्याने जितेशला डीआरएसबद्दल विचारलं, तेव्हा जितेशने मला खात्री नसल्याचं सांगितलं, पण तरीही अर्शदीपच्या आग्रहास्तव सूर्यकुमार यादवने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये ब्रेविसच्या बॅटला बॉल लागल्याचं स्पष्ट झालं, त्यानंतर गावसकरांनी अर्शदीपवर निशाणा साधला. एवढी मोठी एज लागल्यानंतर बॉलरला दिसलं पाहिजे, असं गावसकर म्हणाले.
टीम इंडियाने डीआरएस गमावला असला तरी पुढच्याच ओव्हरला ब्रेविसची विकेट मिळाली. हर्षित राणाने डेवाल्ड ब्रेविसला बोल्ड केलं. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीमध्ये हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. वैयक्तिक कारणांमुळे बुमराह घरी गेला आहे, त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
