खरं तर साऊथ आफ्रिकेचे एका बाजूने एका मागून एक विकेट पडत असताना दुसरीकडे कर्णधार लौरा व्होल्वार्डने एका बाजूने डाव सावरला होता. सामन्यात एक वेळ अशी होती की ती सामना जिंकून बाहेर पडेल असे वाटत होते. भारतीय फॅन्स तिच्या विकेटची प्रतिक्षा करत होते. आणि अखेर तो क्षण आलाच.
दिप्ती शर्माच्या बॉलवर व्होल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडतान उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच पाहताना सर्व भारतीयांचा श्वास रोखला होता.
टीम इंडिया वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेट किपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
दक्षिण आफ्रिका वुमेन्स प्लेइंग इलेव्हन :
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेट किपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
