TRENDING:

IND vs SA Final : भारत जिंकला तर पोरींना 1250000000 रुपये मिळणार? आकडा वाचून डोक्याला झिणझिण्या येतील

Last Updated:

भारताच्या महिला संघाने वर्ल्ड कपचा फायनल सामना जिंकला तर त्यांना 1250000000 इतकी भली मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs South Africa Final
India vs South Africa Final
advertisement

India vs South Africa Final World Cup 2025 : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 ला रंगणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे.या सामन्याची संपूर्ण भारतवासीय उत्सुकतेने वाट पाहतायत. या सामन्याला 21 तास उरले असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर भारताच्या महिला संघाने वर्ल्ड कपचा फायनल सामना जिंकला तर त्यांना 1250000000 इतकी भली मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.त्यामुळे भारतीय संघाची एकप्रकारे लॉटरीच लागणार आहे.

advertisement

नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवला तर त्यांना रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात येणार आहे, असा बीसीसीआयचा एकंदरीत प्लान असल्याचे सुत्रांकडून कळते आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात जेव्हा भारताने अमेरीकेत टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळेस भारतीय संघात टी20 वर्ल्डकपमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले होते. अशाच प्रकारे भारताच्या महिला संघाला देखील बक्षीस स्वरूपात 125 कोटी रूपये दिले जातील, अशी चर्चा आहे. याबाबत बीबीसीआयकडून अधिकृतपणे कोणतीच माहिती दिली गेली नाही.

advertisement

दरम्यान "बीसीसीआय पुरुष आणि महिलांना समान वेतन देण्याचे समर्थन करते आणि म्हणूनच अशी अनेक चर्चा आहेत की जर भारताच्या महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला तर पुरूषांच्या जागतिक विजयापेक्षा बक्षीस कमी नसेल. परंतु त्यांनी विश्वचषक जिंकण्यापूर्वी घोषणा करणे चांगले नाही," असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

advertisement

फायनल जिंकल्यास किती पैसे मिळणार?

आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळतील. ही रक्कम ऑस्ट्रेलियाच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 239टक्के जास्त आहे. तर उपविजेत्या संघाला (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील. ही रक्कम इंग्लंडच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 273 टक्के जास्त आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : भारत जिंकला तर पोरींना 1250000000 रुपये मिळणार? आकडा वाचून डोक्याला झिणझिण्या येतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल