खरं तर भारताने दिलेल्या 298 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे एका मागून एक विकेट पडत होते. त्याचवेळी लॉरा वोल्वार्ड एका बाजूने दक्षिण आफ्रिकेची बाजू भक्कम धरून होती. ती जेव्हा मैदानात होती तिथपर्यंत टीम इडियाच्या खेळाडूंमध्ये भितीचे वातावरण होते.कारण ज्याप्रमाणे तिने मागील सामने खेळले आहेत ते पाहता ती मॅच कोणत्याही क्षणी पालटू शकली असती.
advertisement
दरम्यान दिप्ती शर्माच्या बॉलवर वोल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडताना उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच पाहताना सर्व भारतीयांचा श्वास रोखला होता.
ही कॅच घेताना भारताची सामन्यावर पकड आली नंतर भारताने आफ्रिकेचे इतर खेळाडू आऊट करून फायनल जिंकली.दरम्यान या पराभवानंतर साऊथ आफ्रिकेच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचवेळी भारतीय क्रिकेट फॅन्सनी तिच्या फाईटींग स्पिरीटची दखल घेऊन तिला स्टॅडींग ओव्हेशन देऊन वेल प्लेड लॉरा अशा घोषणाबाजी देऊन तिच्या खेळीचे कौतुक केले.
