दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच फायनलला पोहोचला होता. ऐनवेळी पराभूत होण्याचा, चोकर्सचा शिक्का पुसण्याची संधी त्यांच्याकडे होती. पण पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी त्यांनी कच खाल्ला आणि सामन्यासह वर्ल्ड कप गमावला. या पराभवावर प्रतिक्रिया देताना माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने अपशब्द वापरले.
IND vs SA Final : वर्ल्ड कप विजयानंतर विराट-रोहितची निवृत्ती, IPL खेळणार का नाही? मोठी अपटेड समोर
advertisement
भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय पाठिराख्यांनी जगभरात जल्लोष साजरा केला. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठणाऱ्या संघाला जिंकण्याच्या आशा होत्या. अखेरची चार षटके शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड होतं. मात्र त्यानंतर सामना असा फिरला की भारतीय संघाने शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेला यातून सावरू दिलं नाही.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना अपशब्द वापरले. त्याच्यावर आता टीकाही होत आहे. आपल्या भावना व्यक्त करताना किमान मर्यादा पाळायला हव्या होत्या असं काही चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर म्हटलंय.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव हे लवकर बाद झाले. त्यानंतर विराट कोहली- अक्षर पटेल यांनी डाव सावरलं. विराटने ७६ धावा केल्या तर अक्षर पटेलने ४७ धावांची खेळी केली. शिवम दुबेने शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघ ७ बाद १७६ धावांपर्यंत पोहोचला.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. हेनरिक क्लासेन मैदानात होता तोपर्यंत दक्षिण आफ्रिका सामना सहज जिंकेल असं चित्र होतं. मात्र हार्दिक पांड्याने क्लासनेला बाद करून मोठा अडथळा दूर केला. यानंतर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग यांनी टिच्चून केलेला मारा आणि शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर घेतलेला अफलातून झेल यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ बाद १६९ धावांवर रोखत वर्ल्ड कप जिंकला.