IND vs SA Final : वर्ल्ड कप विजयानंतर विराट-रोहितची निवृत्ती, IPL खेळणार का नाही? मोठी अपटेड समोर
- Published by:Shreyas
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताचा 7 रनने विजय झाला.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताचा 7 रनने विजय झाला, याचसोबत भारताने 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. याआधी 2007 साली धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनंतर दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत तिसरा देश ठरला आहे.
वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहलीने 76 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीबद्दल विराटला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर विराट कोहलीने टी-20 मधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. विराटच्या या घोषणेनंतर रोहितनेही पत्रकार परिषदेमध्ये आपणही निवृत्त होत असल्याचं जाहीर करून टाकलं.
'हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता, ही माझी शेवटची मॅच होती. एक दिवस तुम्ही एकही रन काढू शकत नाही, त्यानंतर हे होतं. देव ग्रेट आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी आजची स्थिती होती. या सामन्यात विजय झाला नसता तरीही मी निवृत्ती घेणार होतो. आता पुढच्या पिढीने T20 क्रिकेट आणखी पुढे घेऊन जायची वेळ आली आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हाला बरीच वाट पाहावी लागली. रोहितने 9 टी-20 वर्ल्ड कप खेळले, मी 6 खेळले. तो हे डिजर्व्ह करतो', असं विराट म्हणाला.
advertisement
दुसरीकडे रोहितनेही हा आपला शेवटचा सामना असल्याचं जाहीर करून टाकलं. '2007 साली याच फॉरमॅटमधून आपण करिअरची सुरूवात केली आणि वर्ल्ड कप जिंकला होता. आता गुड बाय करायला यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मला यातला प्रत्येक क्षण आवडला, वर्ल्ड कप जिंकायचा मला हेच हवं होतं. माझ्यासाठी हा भावुक क्षण होता, आयुष्यात मला ही ट्रॉफी मिळवायचीच होती,' अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.
advertisement
विराट-रोहित आयपीएल खेळणार का?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियासाठी आपली ही शेवटची T20 मॅच होती असं स्पष्टपणे सांगितलं आहे, म्हणजेच त्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे हे दोन्ही दिग्गज खेळाडू आयपीएल खेळताना दिसतील, हे जवळपास निश्चित आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून तर विराट कोहली आरसीबीकडून खेळतो.
advertisement
विराट कोहलीने 125 टी-20 सामन्यांमध्ये 48.7 ची सरासरी आणि 137.04 च्या स्ट्राईक रेटने 4,188 रन केले यात एक शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश होता. तर आयपीएलमध्ये विराटने 252 सामन्यांमध्ये 38.67 ची सरासरी आणि 131.97 च्या स्ट्राईक रेटने 8,004 रन केले. आयपीएलमध्ये विराटच्या नावावर 8 शतकं आहेत.
रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकं करून निवृत्त झाला आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 159 सामन्यांमध्ये 31.34 ची सरासरी आणि 140.89 च्या स्ट्राईक रेटने 4,231 रन केले. रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल 5 शतकं आणि 32 अर्धशतकंही झळकावली आहेत. तर आयपीएलमध्ये रोहितने 257 सामन्यांमध्ये 29.72 ची सरासरी आणि 131.14 च्या स्ट्राईक रेटने 6,628 रन केले, यात 2 शतकं आणि 43 अर्धशतकं आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2024 9:16 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : वर्ल्ड कप विजयानंतर विराट-रोहितची निवृत्ती, IPL खेळणार का नाही? मोठी अपटेड समोर