खरं तर या चुका म्हणजे डीआरएस आहे.फायनल सामन्यात टीम इंडियाचे तीनही डीआरएस वाया गेले आहेत. दीप्ती शर्माच्या 22 ओव्हरमध्ये तिने पाचवा बॉल वाईड टाकला होता पण विकेटकिपर रिचा घोषला काही तरी आवाज आला आणि तिने विकेटसाठी अपिल केली. तिची ही अपिल पाहून हरमनप्रीत कौरने डिआरस घेतला पण तिला नॉटआऊट करार करण्यात आलं आणि बॉल वाईड ठरला अशा प्रकारे भारताने तिसरा डिआरएस गमावला.
advertisement
दुसऱ्या वेळेस अमनज्योतच्या बॉलवर अपील केल्यानंतर एलबीडब्ल्यूसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. ज्यात बॅटचा स्पर्श शंका होती किंवा LBW सारखे दिसत होते.त्यावेळेस ऑन-फील्ड डिसिजन नॉट आऊट होता.रीप्लेजने दाखवले की बॉल बॅटला काहीच लागली नाही. स्नोटॉट्रॅकरने पुष्टी केली की बॉल लेग साइडकडे स्विंग होत होती किंवा इम्पॅक्ट बाहेर पडत होती.त्यामुळे रिव्ह्यू अपयशी ठरला, आणि भारताने दुसरा रिव्ह्यू गमावला.
रेणुका सिंहने नवीन बॉलने ताजमीन ब्रीटससाठी LBW अपील केले.कॅप्टन हरमनप्रीत कौरने DRS साठी सिग्नल दिला. ऑन-फील्ड अंपायरने नॉट आऊट दिले होते. पण रीप्लेज आणि बॉल ट्रॅकरने दाखवले की बॉल ब्रीटसच्या बॅटला स्पर्श केली नाही, पण ती लेग स्टंपच्या बाहेर स्विंग होत होती.हायट आणि पिचिंग योग्य असली तरी, इम्पॅक्ट आणि विकेट्स हिट होण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे रिव्ह्यू अपयशी ठरला, आणि भारताने पहिला रिव्ह्यू गमावला.
अशाप्रकारे भारताने तीन रिव्ह्यू गमावून फायनल सामन्यात मोठी चूक केली आहे. आता जरी रिव्ह्यु गमावले असले तरी भारताला हा सामना जिंकता येतो की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
