नवी मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियवर झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर वर्ल्डकप जिंकणारा भारत हा तिसरा महिलांचा संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २९८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली. उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट वगळता अन्य कोणाला मोठी खेळी करता आली नाही. लॉराने १०१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. मात्र संघाला विजय मिळून देण्यास दिला अपयश आले.
