कोलकातामध्ये पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दक्षिण आफ्रिका आता 22 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे.दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी युनिटमध्ये एका स्टार गोलंदाजाची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीसाठी लुंगी न्गिडीचा संघात समावेश केला आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू न शकलेल्या वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या बदल्यात त्याला ही संधी देण्यात आली आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात विश्वासार्ह आणि अनुभवी गोलंदाजांपैकी एक असलेला रबाडा हा भारतासाठी चिंतेचा विषय होता.बरगडीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही आणि दुसऱ्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता अजूनही संशयास्पद आहे. पण एनगिडीचे पुनरागमन दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाला नवीन बळकटी देईल अशी अपेक्षा आहे. तो काही काळापासून दुखापतींशी झुंजत आहे, परंतु संघ व्यवस्थापनाने पूर्ण तंदुरुस्ती मिळवल्यानंतर त्याला संघात समाविष्ट केले आहे. भारताविरुद्ध मजबूत गोलंदाजी बॅकअपची गरज लक्षात घेता हा निर्णय धोरणात्मक मानला जातो.
दरम्यान पहिली कसोटी हारल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात रबाडाची अनुपस्थिती भारतीय फलंदाजांसाठी दिलासा असू शकते, परंतु त्यांना अजूनही एनगिडीसारखे आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तरी भारत विजयासह मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
दक्षिण आफ्रिका संघ :
एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, सायमन हार्मर, केशव महाराज, देवाल्ड ब्रुविस, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, सेनुरन मुथुसामी आणि झुबेर हमजा.
भारताचा संघ :
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप, कुलदीप, कुलदीप.
