भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात येत्या 13 नोव्हेंबरपासून तीन सराव सामने खेळण्यात येणार आहेत. या सराव सामन्यासाठी तिलक वर्माकडे वनडेची कॅप्टन्सी देण्यात आली आहे.तर ऋतुराज गायकवाडला उप कर्णधार करण्यात आले आहे. खरं तर टीम इंडियाच्या या संघात रियान पराग आणि ऋतुराज गायकवाड सारखे दोन आयपीएल कॅप्टन आहेत, असे असताना देखील नवख्या तिलक वर्माच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
advertisement
अभिषेक शर्मा देखील कर्णधार पदासाठी चांगला उमेदवार होता. पण त्याला संधी न देता तिलकला संधी दिली आहे. तिलक या दोन खेळाडूंपेक्षा ज्यूनिअर देखील आहेत. त्यामुळे तिलक वर्माला कॅप्टन्सी दिल्याने अनेकांना झटका बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन वनडे सामन्यांसाठी भारत अ संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करतील, तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार असतील. संघात इशान किशन आणि प्रभसिमरन सिंग हे दोन यष्टीरक्षक म्हणून आहेत.
सराव सामन्यासाठी भारतीय संघ :
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (विकेटकिपर), आयुष बदोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रसिध्द सिंह (सीबी)
