सहा महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने लिंबूची आवक जास्त झाली आहे. दिवाळी सणात लिंबूचे दर वाढले होते पण पुन्हा काही दिवसांनी लिंबूचे दर कमी झाले. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 10 ते 12 रुपये प्रति 1 किलो दराने लिंबूला भाव मिळाले आहे. तसेच सर्वत्र लिंबूची आवक वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात लिंबूची आवक बंद झाल्याने लिंबूच्या दरावर थेट परिणाम होत आहे. साधारणतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लिंबूची मागणी कमी असल्याने 2 ते 5 रुपये किलो दराने लोणचे तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये लिंबू पाठवले जातात. दर परवडत नसले तरी फॅक्टरीमध्ये लिंबू विक्रीसाठी पाठवावा लागतो.
advertisement
यावर्षी लिंबूची आवक जास्त आहे. पण लिंबू खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. लिंबूची एवढी आवक वाढली आहे की परराज्यातील देखील व्यापारी लिंबू आता पाठवू नका असं म्हणत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ तसेच विजापूर राज्यातून सुद्धा लिंबू विक्रीसाठी सोलापुरात येत आहे. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जयपूर, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात लिंबू विक्रीसाठी पाठवला जात आहे.





