भारताने दिलेल्या 299 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरूवात केली. कर्णधार लॉरा वोलव्हार्टड आणि तझिम ब्रिट्स यांच्यात 51 रनची पार्टनरशीप झाली, पण अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने ही पार्टनरशीप तुटली. यानंतर श्री चारिणीने एनाके बॉशला शून्य रनवर माघारी धाडलं. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर वोलव्हार्टडने सुन लुसच्या मदतीने इनिंग सावरायला सुरूवात केली.
advertisement
शफाली वर्माचा गोल्डन आर्म
टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत वाटत असताना शफाली वर्माने भारताला लागोपाठ दोन विकेट मिळवून दिल्या. 21 व्या आणि 23 व्या ओव्हरमध्ये शफालीने 1-1 विकेट काढली. सून लुसला शफालीने तिच्याच बॉलिंगवर 25 रनवर आऊट केलं, त्यानंतर तिने धोकादायक मरिझेन कॅप्पलाही 4 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आधी सर्वाधिक 87 रनची खेळी केल्यानंतर शफालीने बॉलिंगमध्येही तिची जादू दाखवली.
सेमी फायनलला टीममध्ये आली
शफाली वर्मा वर्ल्ड कपच्या भारतीय टीमचा भाग नव्हती, पण प्रतिका रावलला ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली, त्यामुळे टीम इंडियाला शेवटच्या क्षणी बदल करावे लागले आणि शफाली वर्माची टीम इंडियात एन्ट्री झाली. निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने शेवटच्या क्षणी दाखवलेला हा विश्वास शफालीने फायनलमध्ये सार्थ ठरवला.
