शुभमन गिलची मोठी चूक
चार दिवसांपूर्वी टी-२० सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये परतताच गिअर्स बदलले. अहमदाबादमधील त्याच्या आवडत्या मैदानावर त्याने आठवे कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. पण पुढच्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलने मोठी चूक केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच शुभमनने विकेट फेकली. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करताना, रोस्टन चेसच्या बॉलवर पहिल्या स्लिपमध्ये ग्रीव्हजने त्याला कॅच घेतला. 100 बॉलमध्ये 50 धावा काढल्यानंतर गिल बाद झाला, ज्यामुळे वेस्ट इंडिजला दिवसाचा पहिला आनंदाचा क्षण मिळाला. ऋषभ पंत अनेकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तशीच चूक राहुलने देखील केली.
advertisement
India squad for West Indies Test series : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह
वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस ( कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स, जेडिया ब्लेड्स, जोहान लिन.