वेस्ट इंडिजने 100 टेस्ट खेळणाऱ्या क्रेग ब्रॅथवेटची टीममध्ये निवड केलेली नाही. ब्रेथवेट खराब फॉर्ममुळे टीममधून बाहेर आहे. ब्रेथवेटने वेस्ट इंडिजच्या टेस्ट टीमचं नेतृत्वही केलं आहे, त्याचा अनुभव वेस्ट इंडिजला भारतात कामी आला असता. 32 वर्षांच्या क्रेग ब्रॅथवेट याला भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे, त्याने भारताविरुद्ध 6 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यात त्याने 2 अर्धशतकांच्या मदतीने 239 रन केले.
advertisement
33 वर्षांचा खारी पियरे याची पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. पियरे वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत 3 वनडे आणि 10 टी-20 मॅच खेळला आहे. पियरेने वेस्ट इंडिजकडून त्याची शेवटची मॅच 2020 साली खेळली होती.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली पहिली टेस्ट 2-6 ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादमध्ये होणार आहे. तर सीरिजची दुसरी आणि शेवटची टेस्ट 10-14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीमध्ये खेळवली जाईल. या सीरिजनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, तिथे वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे.
भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजची टीम
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन (उपकर्णधार), केवलन अंडरसन, एलिक अथानजे, जॉन कॅम्पबेल, टेगनारिन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हस, शाय होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, ब्रॅन्डन किंग, अंडरसन फिलीप, खारी पियरे, जेडेन सील्स